उपवर.इन साईटच्या लॉन्च नंतर काही जणांनी हा प्रश्न मला विचारला की, "साइटवर रजिस्ट्रेशनसाठी फी का घेतली जाते?" त्याबद्दल हे स्पष्टीकरण -
- साइटवर रजिस्ट्रेशन १००% फ्री आहे. कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. ज्यांना शंका आहे त्यांनी आधी अनुभव घेऊन पहावा. केवळ पूर्वग्रहातून गैरसमज करून घेऊ नये.
- साइटवर १००% फ्री रजिस्टर करून आपले पूर्ण प्रोफाईल भरता येते. जे रजिस्टर झाले नाही त्यांना म्हणजे आगंतुकांना केवळ स्थळांचे फोटो व अत्यंत बेसीक माहिती मिळते जसे की जात, वय, वास्तव्य उत्पन्न इ. रजिस्टर करून लॉगीन झालात की मेंबर्स साठी वेगळी सर्च उपलब्ध होते जिथे स्थळाची सविस्तर माहिती पाहता येते. ह्यामधे स्थळाने स्वत: भरलेली ९०% माहिती दिसते. केवळ संपर्क क्रमांक सारखी अत्यंत थोडीशी व सेंसिटिव्ह माहिती उपलब्ध होत नाही. संपर्क क्रमांक उपलब्ध न करण्यामागे मुख्य उद्देश हा “त्या निमीत्ताने पैसे उकळणे” नसून “स्थळांची, मुख्यत्वे मुलींच्या स्थळांच्या मोबाईल क्रमांकासारख्या माहितीची गोपनियता राखणे” हा आहे.
- मुळात प्रत्येक स्थळाच्या माहितीखाली संपर्क करण्यासाठीचा ऑप्शन दिलेला असून त्यावर क्लिक करून तुम्ही त्या स्थळाचा थेट मेसेज पाठवू शकता. इथे त्या स्थळाचा इमेल तुम्हाला दिसत नाही की तुमचा त्याला दिसत नाही. पण त्या व्यक्तीला इमेल मात्र जातो. तुम्ही त्या मेसेजमधे काहीही लिहू शकता जसे की, “माझे नाव अमुक असून मी उपवर.इन वर तुमचे प्रोफाईल पाहिले असून मला ते आवडले असेल. तुम्हाला माझे प्रोफाईल आवडल्यास मला xxxxx xxxxx क्रमांकावर संपर्क करा.”. हा मेसेज समोरच्या स्थळाला मिळाला असता त्याने तुम्हाला संपर्क करायचा की नाही हे पूर्णपणे त्याच्या हाती असते. अशाने त्याची गोपनीयता राखली जातेच पण कुठलेही पैसे खर्च न करता तुम्ही तुमचे प्रोफाईल जगभर उपलब्ध करू शकता आणि आवडत्या स्थळांना शॉर्टलिस्ट करू शकता, संपर्क करू शकता.
- मला कल्पना आहे की आपल्या व इतर समाजातील काही मान्यवर ह्या प्रकारची “सर्विस” १००% विनामूल्य उपलब्ध करत आहेत. माझी त्यांच्याशी कुठलीही स्पर्धा नाही. ते करत असलेल्या कामाबद्दल आदर आणि कौतुक आहे. पण आपण हे जे काम करतो ते काही व्हाट्सॅप ग्रुपपुरता मर्यादीत राहते. माहिती/टिपण एकदा कधीतरी पडते, नंतर ते स्क्रोल होऊन जाते. मग शोधल्यावर मिळत नाही. अनेक वेळेस ते योग्य वेळेत योग्य लोकांपर्यंत पोचतच नाही. कारण ही सुवीधा उपलब्ध करणे हा कुणाच्याही “जबाबदारीचा” भाग नाही. जेव्हा एखादी गोष्ट “स्वांत सुखाय” पद्धतीने आपण करतो तेव्हा त्यामधे जबाबदारीची जाणीव नसते की कर्तव्यदक्षता नसते. परीणामस्वरूप त्याचा फायदा खरेच किती लोकांना होतोय हे मोजण्याचे परीमाण उपलब्ध नाही.
- वेळेत स्थळ मिळत नाही आणि वय ३०-३५ ओलांडून जाते तेव्हा काय मनस्थिती असते ते त्या स्थळांनाच माहित. माझ्या बाबत देखील हे घडले असल्याने मी ह्याची किमान कल्पना करू शकते. म्हणून ह्या स्थळांना एक पर्याय जो कायमस्वरूपी उपलब्ध असावा म्हणून हे करते आहे. मला पूर्ण कल्पना आहे की ही समाजसेवा नाही. मला समाजसेवेचे भ्रामक लेबल लावायचे देखील नाही. लग्न जुळवणे हा कुठल्याही समाजसेवेचा भाग नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. उपवर.इन ही एक सुविधा आहे त्यांच्यासाठी ज्यांना वाटते की आपल्याला योग्य साथीदार मिळावा, लकवर मिळावा. शिवाय ह्यात जसे अविवाहीत सामील आहेत तसेच विधवा/विधूर, घटस्फोटीत ह्या घटकांचे विवाह ही देखील आजच्या काळाची गरज आहे. त्यांची स्थळे मांडायला एक व्यासपिठ उपलब्ध करणे हा देखील ह्यामागचा अत्यंत महत्वाचा उद्देष आहे. जे ह्या परिस्थितीमधे आहे त्यांना माझा भावना कळू शकतात..
- आता विषय प्रिमीअम मेंबरशीपचा : एकतर माझी जी कमिटमेंट आहे, “स्थळांचे रजिस्ट्रेशन आणि माहिती १००% फ्री उपलब्ध करणे” आणि “विधवा/विधूर/घटस्फोटीत लोकांना व्यासपिठ देण्याबाबत” ती मी पूर्ण करते आहे. एक कायम स्वरूपी व्यासपिठ ज्यावर तुमचे प्रोफाईल लिस्ट करणे, ते विवीध प्रकारे फिल्टर करू शोधणे, ते बुकमार्क करणे, संपर्क करणे हे सारे १००% विनामूल्य उपलब्ध केलेले आहे. माझीच आयटी कंपनी असल्याने हे मी करू शकले. अशा प्रकारची वेबसाईट बनवायला आम्ही शक्यतो अडीज ते तिन लाख रुपये घेतो. ह्यातील किमान ७०% रक्कम साईट बनण्यापूर्वीच अपरिहार्यपणे खर्च करावी लागते. जी उपवर.इन बाबत मी केली. कारण मला खरेच ही काळाची गरज वाटते. आणि इतक्या सेवाभावी संस्था, व्यक्ती हे काम करत असताना देखील पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही हे मला जाणवले म्हणून. ही माझा परीने मी समाजासाठी करत असलेली सर्विस आहे… जरी साइट डेव्हलप करण्याचा खर्च मी केला असला तरी साईट म्हणजे काय व्हाट्सॅप नाही जे फ्री उपलब्ध होते. साईट चालवायला, ती मेंटेन करायला, सुरक्षीत राखायला, अद्ययावत राखायला सातत्याने खर्च येत असतो. ह्या खर्चाची तरतूद जर साईटवरील “प्रिमीअम मेंबरशीप” ह्या माध्यमातून होऊ शकली तर भविष्यात ही साईट व सर्विस कुणाच्या अनुदानावर अवलंबून न राहता समाजासाठी असलेले १००% आत्मनिर्भर (self sustainable) उपक्रम बनेल ह्या अनुषंगाने ह्या पर्यायाकडे पाहते आहे. (प्रिमीअम मेंबरशीपबाबत माहिती)
ही झाली माझी बाजू. त्यातूनही ही सर्विस पूर्णपणे ऐच्छिक आहे. जे रजिस्टर होतील त्यांनाच त्याचा फायदा लक्षात येईल. ज्यांना अजूनही शंका असेल ते माझाशी संपर्क करू शकतात. मी त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
— नमिता सामंत (9423 684 629),
निर्माती आणि संचालक, उपवर.इन