उपवर वधुवर सूचक केंद्र हे मुख्यत्वे ब्राम्हण, सारस्वत, सिकेपी, दैवज्ञ ब्राम्हण व मराठा समाजातील उपवर वधुवरांसाठी चालवलेले खुले संकेतस्थळ आहे. इथे कुणीही रजिस्टर होऊ शकते आणि ते देखील विनामूल्य. रजिस्टर करताना इमेल व मोबाईल देणे अनिवार्य आहे. सदर संकेतस्थळ सातत्याने मॉनिटर केले जाते व ह्यावरील प्रत्येक संशयास्पद ॲक्टिविटी स्पॅमर मेकॅनिझम व सायबर क्राईमला रिपोर्ट केली जाते. शिवाय केंद्रातील अधिकारी नव्याने रजिस्टर झालेल्या स्थळांचे व्हेरीफिकेशन देखील करतात. त्यामधे फसवेगिरी व/वा खोटेपणा आढळल्यास अशी प्रोफाईल्स कायमस्वरूपी ब्लॉक केली जातात व रिपोर्ट केली जातात.
उपवर.इन ह्या संकेतस्थळाची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली असून केवळ मोबाईल वापरून आपले प्रोफाईल बनवणे, त्यात बदल करणे हे एकदम सोपे व सहज आहे. ही पूर्णपणे ऑनलाईन वेबसाईट असल्याने तुमचा डेटा जगभरातील लोक पाहू शकतात. तुमचा जोडीदार जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याच्या पर्यंत तुमची माहिती पोहोचू शकते! आणि हे सारे विनामूल्य उपलब्ध केलेले आहे. कारण? कारण प्रत्येकाला उपवर जोडीदार मिळायलाच हवा व लग्नसंस्था अविरत चालायला हवी!
उपवर.इन चे रजिस्ट्रेशन मोफत/फ्री आहे का?
उपवर.इन ही मुख्यत्वे ब्राम्हण व मराठा समाजातील वधुवरांसाठी चालवलेली विनामूल्य सेवाभावी वेबसाईट असून ह्यावर प्रोफाईल नोंदवणे १००% फ्री आहे.
उपवर.इन चे रजिस्ट्रेशन का करायचे?
रजिस्टर केल्यावर तुम्हाला तुमची सविस्तर माहिती देता येते जी माहिती जगभरातील विवाहोत्सुक उपवर स्थळे पाहू शकतात. तसेच उपवर संकेतस्थळावरील रजिस्टर्ड प्रोफाईल्सची सविस्तर माहिती पाहता येते. विशेष फिल्टर्स पाहता येतात व आवडलेली स्थळे शॉर्टलिस्ट देखील करता येतात. रजिस्टर केले नाही तर स्थळाचे नाव देखील पाहता येत नाही!
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहे?
उपवर.इन च्या संकेतस्थळावरील "रजिस्टर व्हा" ही लिंक केल्यावर तुमच्या समोर एक छोटासा फॉर्म येतो. तो भरून तुम्ही तुमचे प्रोफाईल रजिस्टर करू शकता. रजिस्टर झाले असता तुम्हाला एक मेल येतो. काही वेळेस इमेल स्पॅम फोल्डर मधे जातात. तेव्हा इनबॉक्स सोबत स्पॅम देखील चेक करा. ह्या मेलमधे तुमचा पासवर्ड कसा सेट करायचा ह्याची माहिती असते. तुमचे युजरनेम आणि पासवर्ड किंवा मोबाईल आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉगीन करू शकता. लॉगीन केल्यावर तुम्हाला ॲडवान्स सर्च उपलब्ध होते. तुम्ही तुमचे पूर्ण प्रोफाईल भरू शकता जेणेकरून इतरांना ते शोधायला व शॉर्टलिस्ट करायला सोपे जाईल!
उपवर.इन वरील माझा डेटा कितपत सुरक्षीत आहे?
सदर संकेतस्थळावरील तुमचे इमेल आणि मोबाईल कधीच कुणासोबत शेअर केले जात नाही. प्रत्येक प्रोफाईलला संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट फॉर्म असतो जो भरून पोस्ट केला असता त्या व्यक्तीला परस्पर मेल जाते. ह्यामुळे तुमचा इमेल व मोबाईल कधीच प्रकट केला जात नाही की शेअर केला जात नाही. मुख्यत्वे मुलींच्या प्रोफाईलसाठी व गोपनीयतेसाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची आहे. तसेच कुठल्याही प्रोफाईलची प्रत्यक्ष जन्मतारीख व वेळ प्रकट केली जात नाही. केवळ वय दर्शवले जाते. अशा प्रकारे तुमची सेंसिटीव्ह माहिती कायमच संरक्षीत असते.
उपवर.इन ही अद्ययावत द्रुपाल तंत्रज्ञान वापरून बनवलेली वेबसाईट असून ह्यावरील तुमचा डेटा १००% सुरक्षीत आहे. द्रुपाल हे एंटरप्राईज ग्रेड तंत्रज्ञान वापरून अमेरिकेतील व्हाइट हाऊस, भारतातील NIC, महाराष्ट्रातील आपले सरकार अशा अत्याधुनिक वेबसाईट्स डेव्हलप केल्या जातात. त्या १००% सुरक्षीत असून स्पॅम होत नाही की हॅक होत नाही!
एखादे स्थळ आवडल्यास काय करायचे?
एखादे स्थळ आवडल्यास तुम्ही उपवर.इन च्या ॲडमिनला संपर्क करून त्या प्रोफाईलचा रजिस्ट्रेशन नंबर शेअर करू शकता व त्याबद्दल अधिक माहिती मागवू शकता. तुम्हाला आवडलेली स्थळे तुम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवू शकता.
माझा पासवर्ड हरवला तर काय करायचे?
जनरली तुम्ही उपवर.इन पोर्टलवर लॉगीन केले तर ते बराच काळ टिकून राहते. सिस्टीम शक्यतो तुम्हाला ऑटोलॉगाऊट करत नाही. पण तुम्ही पासवर्ड विसरलात तर तो पासवर्ड फॉर्म वापरून परत मिळवू शकता.
उपवर.इन ची प्रिमीअम सर्विस काय आहे?
उपवर.इन संकेतस्थळाचा डोलारा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असून ते सातत्याने अपडेट राखणे अनिवार्य असते. हे अत्यंत खार्चिक आणि जिकीरीचे आहे. ह्यासाठी एक प्रिमीअम सर्विस आहे ज्यामधे अत्यंत माफक दर आकारून आपण रजिस्टर्ड मेंबर्सना अधिकच्या विशेष सुविधा देतो. प्रिमीअम सर्विस बद्दल इथे वाचा.